सातारा - जिल्ह्यात रविवारी रात्री आलेल्या अहवालातील 31 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अमोद गडीकर यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींची संख्या 309 आहे. यापैकी 182 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 120 आहे. तर, आतापर्यंत 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नवीन कोरोनाबाधित रुग्ण या भागांतील -
कराड तालुका - म्हासोली 5, शामगाव 1, इंदोली 4,
पाटण - गोळूक तर्फ पाटण 3
कोरेगाव - वाघोली 1