महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील 'त्या' कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'नेच - सातारा जिल्हाधिकारी बातमी

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात कापरेवस्ती व शिंदेवस्तीतील कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'नेच झाल्याचा अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 19, 2021, 4:31 PM IST

Updated : Jan 19, 2021, 4:56 PM IST

सातारा - जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात कापरेवस्ती व शिंदेवस्तीतील कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'नेच झाल्याचा अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहे.

बोलताना वैद्यकीय अधिकारी

लॅबोरेटरीचा अहवाल पाॅझीटिव्ह

मरिआईचीवाडी (ता. खंडाळा) येथील कापरेवस्ती व शिंदेवस्ती येथील घरगुती पोल्ट्री फार्ममधील शेकडो कोंबड्या गेल्या आठवड्यात दगावल्या होत्या. प्रशासनाने गांभिर्याने दखल घेत प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या. भोपाळ येथील लॅबोरेटरीचा अहवाल आज (दि. 19 जाने.) प्रशासनाला मिळाला. त्यात बर्डफ्ल्यूचे निदान झाल्याने खळबळ उडाली.

कोंबड्या मारण्याचे आदेश

मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथील बाधित जागेच्या केंद्रस्थानापासून संक्रमित क्षेत्र व सर्वेक्षण क्षेत्रामधील सर्व देशी कुक्कुट पक्षी, पोल्ट्री फार्ममधील पक्षी व इतर प्रजातीचे पाळीव पक्षी यांची जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अंतर्गत स्थापित पथकामार्फत शास्त्रोक्त पध्दतीने पक्षांना मारण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मृत पक्ष्यांची मार्गदर्शक सूचनेनुसार विल्हेवाट लावण्यात यावी. संक्रमित क्षेत्रातील पक्षीखाद्य घटक अंडी, अंड्याचे पेपर ट्रे, बास्केट खुराडी व पक्षी खत किंवा विष्टा इत्यादीचे शास्त्रोक्त पद्धतीने नष्टीकरण करुन विल्हेवाट लावावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सर्वेक्षण क्षेत्रात आत-बाहेरील मालावर बंदी

सर्वेक्षण क्षेत्रामध्ये बाहेरुन येणारे व बाहेर पाठविण्यात येणारे चिकन प्रक्रिया, पक्षी, खाद्य व अंडी इत्यादीची हालचाल, विपणन व विक्रीवर तीन महिने बंदी राहील. संक्रमीत क्षेत्रामधील पक्षांची कलींग, स्वच्छता, निर्जंतुकीकरण आदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुक्कुट पक्षी, चिकन व अंडी विक्रीची दुकाने सुरू करण्यास व यांमध्येही फक्त सर्वेक्षण क्षेत्रामधील उत्पादित कुक्कुट पक्षी व अंडी यांची अंतर्गत होणारी हालचाल व विक्रीस परवानगी राहील.

'बर्ड फ्ल्यू'च्या मुकाबल्यासाठी जलद प्रतिसाद दल गठीत

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यापूर्वीच दहा किलोमीटरचा परिसर 'सतर्क क्षेत्र' म्हणून घोषित केला आहे. त्याच अनुषंगाने बर्ड फ्ल्यूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जलद प्रतिसाद गटाची स्थापना करण्यात आली आहे.

एक किलो मिटरमध्ये हाय अलर्ट

बर्ड फ्यूचे निदान झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बाधित जागेचा केंद्रबिंदू धरुन 1 किलोमिटर क्षेत्र संक्रमीत क्षेत्र व 10 किलो मीटर क्षेत्र हे सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

हणबरवाडी निगेटीव्ह

कराड तालुक्यातील हणबरवाडी येथील मृत पक्ष्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने यापूर्वी लागू केलेला सतर्क क्षेत्रातील बंदी आदेश रद्द करण्यात आललेल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

Last Updated : Jan 19, 2021, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details