महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Prithviraj Chavan On Modi : ईडीच्या धाकाने 'मविआ' सरकार पाडणार्‍या मोदी सरकारची वाटचाल हिटलरशाहीकडे - पृथ्वीराज चव्हाण - Prithviraj Chavan On Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( Prime Minister Narendra Modi ) नोटबंदी, जीएसटी ( GST ) यासारखे अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली आहे. देश चालवायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. या सगळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी केला आहे.

Modi government's move towards Hitlerism
मोदी सरकारची वाटचाल हिटलरशाहीकडे

By

Published : Jul 27, 2022, 7:25 PM IST

सातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ( Prime Minister Narendra Modi ) नेतृत्वाखालील केंद्र सरकारची वाटचाल हिटरशाहीकडे ( hitarshahi ) सुरू आहे. ईडीचा धाक दाखवून केंद्रातील भाजप सरकारने महाविकास आघाडी सरकार ( Maha Vikas Aghadi Govt ) पाडले. आता काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा घाट घातला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी आज केला. केंद्र सरकारच्या निषेधार्थ कराडमध्ये झालेल्या सत्याग्रह आंदोलनात ते बोलत होते. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण

ईडीचा वापर करून विरोधकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी, जीएसटी यासारखे अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली आहे. देश चालवायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. या सगळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ईडीचा वापर करून विरोधकांना वेठिला धरण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोनिया गांधी यांना त्रास दिला जात आहे. बारा वर्षांपूर्वी संपलेला विषय उकरुन काढत ईडीच्या चौकशीचे नाटक लावले आहे. त्याला आमचा विरोध असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण

हेही वाचा -I was raped says victim after 12 yrs:'माझ्यावर बलात्कार झाला', 12 वर्षांनंतर पीडित मुलगीने केला गौप्यस्फोट

काँग्रेसचा विचार दडपण्याचा डाव - उदयसिंह पाटील म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारकडून काँग्रेसचा विचार दडपण्याचा डाव सुरू आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण करून समाजामध्ये फूट पाडली जात आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ताकदीने प्रयत्न करायला पाहिजे. ज्या विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ते विचार जपणे, ही आपली जबाबदारी आहे.

मोदी सरकारची वाटचाल हिटलरशाहीकडे

मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन -कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून सत्याग्रह मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे सचिव अँड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरचे नगराध्यक्ष मनोहर शिंदे सहभागी झाले होते. मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. तसेच रस्त्यात टायरही पेटवला.

हेही वाचा -Nagpur Crime Record : नागपुरात हत्येच्या सरासरी घटनांमध्ये घट; सात महिन्यात 37 हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details