महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटी चालकाची स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या

दहिवडी एसटी आगारमध्ये चालक म्हणून कार्यरत असणारे काशीनाथ अनंतराव वसव (52) यांनी आज (रविवार) पहाटे दहिवडी येथील स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

satara
एसटी चालकाची स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या

By

Published : Dec 8, 2019, 11:40 PM IST

सातारा - माण तालुक्यातील दहिवडी एसटी आगारमध्ये चालक म्हणून कार्यरत असणारे काशीनाथ अनंतराव वसव (52) यांनी आज (रविवार) पहाटे दहिवडी येथील स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून पोलीस याबाबत तपास करत आहेत.

एसटी चालकाची स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या

याबाबत अधिक माहिती अशी, की आज पहाटेच्या सुमारास दहिवडी येथील स्मशानभूमीतील शेडला कुणीतरी फास घेऊन आत्महत्या केल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दिसले. त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यावेळी वसव यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. सध्या पोलीस पंचनामा करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून वसव यांनी आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details