सातारा - सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या जिल्ह्यास लागून असलेल्या माण तालुक्यातून जोडले गेलेले म्हसवड-अकलूज व शिंगणापूर-नातेपूते हे दोन्ही रस्ते सील करण्यात आले आहेत. परिणामी, वाहनचालकांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागत आहे.
सोलापूरमधून साताऱ्यात येणारे वाहतुकीचे मार्ग बंद, प्रवाशांची गैरसोय - सातारा लेटेस्ट न्यूज
सातारा-म्हसवड-लातूर या राष्ट्रीय महामार्गावर नियमित जादा संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. पण, अचानकपणे सातारा व सोलापूर या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेलगत जळूबाईच्या घाटाखाली रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने आडवे खोल चर खोदून आणि रस्त्यावर सिमेंट पाइप्स टाकून हा रस्ता वाहतुकीस पूर्णत: बंद करण्यात आला.
सातारा-म्हसवड-लातूर या राष्ट्रीय महामार्गावर नियमित जादा संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. पण, अचानकपणे सातारा व सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेलगत जळूबाईच्या घाटाखाली रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने आडवे खोल चर खोदून आणि रस्त्यावर सिमेंट पाइप्स टाकून हा रस्ता वाहतुकीस पूर्णत: बंद करण्यात आला. मात्र, सातारा जिल्ह्यातील सर्व सीमा मोकळ्या ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील मुख्य रस्ता, शिंगणापूर ते सोलापूर जिल्ह्याला नातेपूते गावास जोडला गेलेला रस्ता घाट संपताच चर खोदून मुरुमाचे बांध टाकून बंद करण्यात आला आहे. परिणामी सातारा-नातेपुतेकडे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय झाली आहे. सातारा-म्हसवड-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग फक्त वाहतुकीस खुला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात 'आवो जावो घर तुम्हारा' असे झाले आहे.