महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील सहा कोरोनाबाधित कैद्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज!

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींची संख्या 278 असून यापैकी उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्या 151 इतकी असून, कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 120 आहे तर मृत्यू झालेले 7 रुग्ण आहेत.

Covid 19 satara
साताऱ्यातील 6 कोरोनाबाधित कैदी रुग्ण पूर्णपणे बरे

By

Published : May 24, 2020, 10:06 PM IST

सातारा - क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या जिल्हा कारागृहातील 6 कैदी रुग्णांचे 14 दिवसानंतर दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

साताऱ्यातील 6 कोरोनाबाधित कैदी रुग्ण पूर्णपणे बरे

सातारा जिल्हा कारागृहात पुण्याहून आणल्या गेलेल्या कैद्यांमुळे कोरोनाचा संसर्ग पसरला. काही कैदी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील 6 जणांचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. ते बरे झाल्याने 6 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

67 जण विलगिकरण कक्षात

क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात 29, वाईच्या ग्रामीण रुग्णालयात 38 असे एकूण 67 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींची संख्या 278 असून यापैकी उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्या 151 इतकी असून, कोरोनामुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 120 आहे तर मृत्यू झालेले 7 रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details