सातारा - कराडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेणारे आणखी 6 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये 5 परिचारिकांसह 10 वर्षाच्या एका मुलाचा समावेश आहे. या सर्वांचे 14 आणि 15 दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
कराडमधील सहा रुग्ण कोरोनामुक्त, पाच परिचारिकांसह एका लहान मुलाचा समावेश - साताऱ्यातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या
कराडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेणारे आणखी 6 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये 5 परिचारिकांसह 10 वर्षाच्या एका मुलाचा समावेश आहे. परिचारिका व कर्मचार्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना रुग्णालयातून निरोप दिला.
कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगिता देशमुख, वैद्यकीय विभागप्रमुख व्यकंटेश मुळे यांनी कोरोनामुक्त रुग्णांना पुष्पगुच्छ दिला. परिचारिका व कर्मचार्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना रुग्णालयातून निरोप दिला.
आत्तापर्यंत क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 8, कृष्णा रूग्णालय कराड येथील 27, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 4 आणि सह्याद्री रुग्णालय कराड येथील 6, असे जिल्ह्यातील एकूण 45 रुग्ण कारोनामुक्त झाले आहेत.