सातारा - सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राजेंविरुद्ध श्रीनिवास पाटील यांच्या रंगतदार लढतीत सातारा लोकसभेचा आखाडा रंगणार आहे.
सातारा लोकसभेचा आखाडा रंगणार.. उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील - उदयनराजे भोसले Vs श्रीनिवास पाटील
सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकित उदयनराजें विरोधात आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उमेदवार असतील असे बोलले जात होते. मात्र, कराड येथील सभेत कार्यकर्त्यांनी दक्षिण-कराडच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमधून लढवयचे ठरवले. यानंतर आज (मंगळवारी) श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा -महायुतीची घोषणा : फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात, फॉर्म वाटप सुरू
या पोटनिवडणूकीसाठी श्रीनिवास पाटील गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकित उदयनराजें विरोधात आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उमेदवार असतील असे बोलले जात होते. मात्र, कराड येथील सभेत कार्यकर्त्यांनी दक्षिण-कराडच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मधून लढवयचे ठरवले. यानंतर आज (मंगळवारी) श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.