सातारा - सातारच्या गादीचा मान राखणार्या जनतेचा उदयनराजेंनी विश्वासघात केल्याची टीका काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी केली. तसेच तिसर्यांदा मीच निवडून येणार, अशी डरकाळीही त्यांनी फोडली. कराड तालुक्यात झालेल्या प्रचार सभेत श्रीनिवास पाटील बोलत होते. यावेळी कराड दक्षिणमधील महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
उदयनराजेंनी जनतेचा विश्वासघात केला; श्रीनिवास पाटील यांचे टीकास्त्र - SHREENIWAS PATIL
राष्ट्रवादीने आणि सातारच्या जनतेने तुम्हाला वाव दिला. गादीचा मान राखला. पण, तुम्ही त्यांचा विश्वासात केला. जनतेला विचारात न घेता जातीयवादी पक्षात गेलात, असा टोलाही श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना मारला.
राष्ट्रवादीने आणि सातारच्या जनतेने तुम्हाला वाव दिला. गादीचा मान राखला. पण, तुम्ही त्यांचा विश्वासात केला. जनतेला विचारात न घेता जातीयवादी पक्षात गेलात, असा टोलाही श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना मारला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला तिसर्यांदा मीच निवडून येणार, अशी डरकाळी फोडत श्रीनिवास पाटील यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. या निवडणुकीत राज्याची भावी दिशा ठरणार आहे. हे लक्षात घेऊन मतदान करा. आम्ही आमचा केंद्र व राज्यातील अनुभव पणाला लावून जनतेची अपेक्षा नक्की पूर्ण करू. गेल्या दहा वर्षात चुकीचा खासदार निवडून दिल्यामुळे आपले मत वाया गेले आहे. ती दुरूस्ती या निवडणुकीत करा. विरोधक विकासाच्या मुद्यांवर चर्चा करत नाहीत. खर्च वाढत चालल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल, तर काँग्रेस व राष्ट्रवादी महाआघाडीशिवाय पर्याय नाही. लोकशाही वाचवण्यासाठी जातीयवादी पक्षांना हद्दपार करा. लोकांना भयभीत करून आमिषे दाखवली जात आहेत. परंतु, जनतेचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. पुन्हा एका पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास पेशवाई यायला वेळ लागणार नाही, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली.