महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'माझा काटा काढायला कोणी आले, तर काट्याने काटा काढावाच लागेल' - खासदार शरद पवार

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर शिवेंद्रराजे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये 'शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या भेटीत त्यांना कुठलेही आश्वासन दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आपण खासदारांबरोबर चर्चा करू, असे पवार यांनी सांगितले होते. पण याची खात्री कोण घेणार,' असा सवाल देखील शिवेंद्रराजे यांनी यावेळी उपस्थित केला.

शिवेंद्रराजे भोसले

By

Published : Aug 1, 2019, 9:04 PM IST

सातारा -माझ्या मतदारसंघातील अंतर्गत कुरघोड्या वेळोवेळी पक्षनेतृत्त्वाच्या कानावर घातल्या होत्या. मात्र, त्यांनी चर्चा करू असे सांगितले. फक्त चर्चाच किती दिवस करणार होते. मात्र, आता पक्ष बदलला आहे. आता माझा काटा काढायला कोणी आले, तर काट्याने काटा काढावाच लागेल, असा इशारा शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

शिवेंद्रराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. खासदार शरद पवार यांनी बुधवारी रात्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सकाळी पत्रकार परिषदेत घेतली. त्यामध्ये शिवेंद्रराजे यांच्या जाण्याने काही फरक पडणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच, मी पक्ष सोडून जाणार नाही, असे आश्वासन शिवेंद्रराजेंनी दिले होते, असे पवार म्हणाले.

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर शिवेंद्रराजे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये 'शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या भेटीत त्यांना कुठलेही आश्वासन दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण खासदारांबरोबर चर्चा करू, असे पवार यांनी सांगितले होते. पण याची खात्री कोण घेणार,' असा सवाल देखील शिवेंद्रराजे यांनी यावेळी उपस्थित केला.

'मी पक्षाला फसवले नाही. लोकसभेला माझ्या मतदार संघातून मताधिक्य मिळवून दिले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर देशाने दोन वेळा शिक्कामोर्तब केले आहे. लोकसभेला पक्षा बरोबर राहून काम केले. आता नवीन निवडणुकी येत आहेत. त्यावेळी पक्ष सोडण्याची भूमिका घेतली. गेली अनेक वर्षे आमचे कुटुंब पक्षाबरोबर आहे. इतक्या वर्षांनंतर एखाद्या घराण्याला असा निर्णय का घ्यावा लागतो, याचा विचार पक्ष नेतृत्वाने करायला हवा,' असेही शिवेंद्रराजे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details