सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब आणि गरजू लोकांच्या पोटापाण्याचे हाल होऊ नयेत, म्हणून कराडमध्येही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गरजूंना आता ५ रुपयात जेवण मिळणार आहे.
कराडमध्येही आता शिवभोजन थाळी; गरजूंना मिळणार ५ रूपयात जेवण - karad satara
कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ झाला. कराड शहरातील दौलत भोजनालय आणि ओम हरिप्रसाद हॉटेलमध्ये शिवभोजन थाळी मिळणार आहे.
shivbhojan thali
कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ झाला. कराड शहरातीलदौलत भोजनालय आणि ओम हरिप्रसाद हॉटेलमध्ये शिवभोजन थाळी मिळणार आहे. गोरगरीब, गरजू व्यक्तींनी या शिवभोजन थाळीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी दिघे आणि तहसीलदार वाकडे यांनी केले.