सातारा- 'जाणता राजा' म्हणा असे मी कुणाला म्हटलेलो नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणे वाचला तर शिवाजी महाराजांची 'छत्रपती' हीच उपाधी होती, जाणता राजा ही नव्हती, हे लक्षात येईल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
शिवाजी महाराजांची उपाधी 'छत्रपती' हीच होती, 'जाणता राजा' नव्हे - शरद पवार - Satara latest news
शिवाजी महाराजांची 'छत्रपती' हीच उपाधी होती, जाणता राजा ही नव्हती, असे वक्तव्य शरप पवार यांनी केले आहे.
जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजचं आहेत, असे म्हणत शिवाजी महाराजांचे वशंज आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिल्यानंतर साताऱ्यातील कार्यक्रमात शरद पवारांनी यांनीही यावर भाष्य केले आहे.
शरद पवार म्हणाले की, जाणता राजा म्हणा असे मी कुणाला म्हटलेलो नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणे वाचला तर शिवाजी महाराजांना लोकांनी छत्रपती ही उपाधी दिली होती, जाणता राजा ही नव्हती, हे लक्षात येईल. जाणता राजा हा शब्दप्रयोग रामदास स्वामींनी जन्माला घातला. जे लोक रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, असे सांगतात ते खोटा इतिहास लादण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही पवारांनी केला. रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. असे विधानही पवार यांनी केले. शिवाजी महाराजांच्या गुरु या राजमाता जिजाऊ होत्या, असेही पवारांनी सांगितले.