सातारा- रामदास स्वामी यांनी जाणता राजा हा शब्द जन्माला घातला होता. रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हते, शिवरायांच्या गुरू या माँसाहेब जिजामाता होत्या, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजचं आहेत, असे म्हणत शिवाजी महाराजांचे वशंज आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिल्यानंतर साताऱ्यातील कार्यक्रमात शरद पवारांनी यांनीही यावर भाष्य केले आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास नीट वाचा. लोकांनी त्यांना जाणता राजा नव्हे, तर छत्रपती ही उपाधी दिली होती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.