महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोयना धरणातील पाणीसाठ्याने पंच्याहत्तरी ओलांडली, 75.63 टीएमसी पाणी - satara rain update news

कोयना धरण परिसरासह पाटण तालुक्यातही पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या 75.63 टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 29.37 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

seventy five tmc water in koyna dam due to heavy rainfal
seventy five tmc water in koyna dam due to heavy rainfal

By

Published : Aug 12, 2020, 8:38 AM IST

सातारा - कोयना धरणांतर्गत विभागात काही प्रमाणात पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून प्रतिसेकंद सरासरी 20 हजार 578 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून सध्या धरणात एकूण उपलब्ध पाणीसाठा 75.63 टीएमसी इतका झाला आहे.

कोयना धरण परिसरासह पाटण तालुक्यातही पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या 75.63 टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 29.37 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. सोमवार ते मंगळवार संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात 1.12 टीएमसीने तर पाणी उंचीत 1.3 फुटाने वाढ झाली आहे. धरणात सध्या एकूण उपलब्ध पाणीसाठा 75.63 टीएमसीपैकी उपयुक्त साठा 70.63 टीएमसी, पाणीउंची 2136.3 फूट, जलपातळी 651.129 मीटर इतकी झाली आहे. चोवीस तासातील व एक जूनपासून आजपर्यंतचा एकूण पाऊस पुढीलप्रमाणे, कोयना 49 मिलीमीटर (2792), नवजा 54 (3072), महाबळेश्वर 57 (2984), वळवण 88 (3699) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details