महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'टिकटॉक'वर रंगला तमाशाचा फड, रहिमतपूर पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत पोलिसांची नजर चुकवून अपशिंगे (ता.कोरेगाव) येथे टिकटॉक बनवण्यात येत होता

satara tiktok
satara tiktok

By

Published : Apr 17, 2020, 7:18 AM IST

सातारा - जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत पोलिसांची नजर चुकवून अपशिंगे (ता.कोरेगाव) येथे टिकटॉक बनवण्यात येत होता. काही युवक गर्दी जमवून टिकटॉकवर व्हिडिओ बनवून मोबाईलवर लावणी लावून पैसे उधळतानाचा व्हिडीओ करून समाज माध्यमांवर शेअर करत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ७ जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रहिमतपूर पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, अपशिंगेा(ता.कोरेगाव) येथे काही युवक गर्दी जमवून टिकटॉकवर व्हिडिओ बनवून मोबाईलवर लावणी नृत्य लावून पैसे उधळतानाचा व्हिडीओ करुन टिकटॉक व इतर सोशल माध्यमांवर शेअर करीत असल्याचे समजले. तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक जी.आर. बल्लाळ यांच्या मार्गदशनाखाली पोलिसांची कुमक पाठवून अपशिंगे येथून ७ युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भा.द.वि. कलम १८८ प्रमाणे कोरेगाव न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून त्यांना ताकीद देवून सोडून देण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस हवालदार राहुल कणसे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details