सातारा- मंगल जेधे खून प्रकरणात सिरियल किलर संतोष पोळ याच्याविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोप निश्चिती करून नये, असा अर्ज बचाव पक्षाच्यावतीने करण्यात आला होता. यावर मंगळवारी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावर न्यायालयाच्यावतीने 3 ऑगस्ट रोजी निकाल देण्यात येणार आहे.
साखळी खून प्रकरणी सिरियल किलर संतोष पोळची न्यायालयात सुनावणी - vai
वाई परिसरात मंगल जेधेसह 6 जणांच्या खूनप्रकरणी सिरियल किलर संतोष पोळ याला सातारा पोलिसांनी अटक केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाई परिसरात मंगल जेधेसह 6 जणांच्या खूनप्रकरणी सिरियल किलर संतोष पोळ याला सातारा पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. पोलिसांच्यावतीने दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यावर बचाव पक्षाच्यावतीने दोषारोपपत्रात आरोपी संतोष पोळ याच्यावर आरोप निश्चिती होत नसल्याने त्याला सोडू देण्यात यावे, असा अर्ज केला होता. त्यावर जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी संतोष पोळ याला येरवडा कारागृहातून न्यायालयात हजर करण्यात आले होते.
‘सरकार पक्षाच्यावतीने सादर केलेले दोषारोपामध्ये पोलिसांचा पंचनामा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि माफीची साक्षीदार ज्योती मांढरेची कबुली याचा समावेश आहे. संतोष पोळ याच्यावर आरोप निश्चितीसाठी हे सर्व पुरावे पुरेसे असल्याने बचाव पक्षाचा अर्ज फेटाळावा’ असा युक्तीवाद विशेष सरकारी वकिल उज्वल निकम व सहाय्यक सरकारी वकिल मिलिंद ओक यांनी केली. यावर न्यायालयाने 3 ऑगस्ट रोजी निकाल देण्यात येणार आहे.