सातारा - माण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसताना त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक हातामध्ये हॅन्ड ग्लोज घालून रुग्णांचे उपचार करत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती नागरिकांना समजतात नागरिकांनी तसेच मनसे जिल्हाध्यक्षांनी दहिवडी ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्यालयात रात्री दहा वाजता ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकीय सेवा कशी चालते हे समोर आले आहे.
आरोग्याची एैशी की तैशी..! माणमधील ग्रामीण रुग्णालयात सुरक्षारक्षक करतोय चक्क डॉक्टरांचे काम
सातारा पंढरपूर रस्त्यावर रात्री अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीला दहिवडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याचे काम सुरक्षा रक्षक हातामध्ये हॅन्ड ग्लोज घालून अपघातग्रस्तावर उपचार करत होते. हे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
याबद्दल अधिक माहिती अशी की, सातारा पंढरपूर रस्त्यावर रात्री अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीला दहिवडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याचे काम सुरक्षा रक्षक हातामध्ये हॅन्ड ग्लोज घालून अपघातग्रस्तावर उपचार करत होते. हे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. हे समजताच मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी याबद्दल विचारणा केली असता त्यांना देखील उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आले.
यानंतर धैर्यशील पाटील व नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पोलीस मध्यस्थी करीत असतानाच पोलीसांच्या गाडीतून एका आरोपीला या ठिकाणी तपासणीसाठी आले. त्याची त0पासणी करण्यासाठी कोणीही डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यामुळे पोलिसांनी देखील आरोपीला गोंदवले येथील रुग्णालयाकडे हलवले. रात्री बाराच्या सुमारास पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन पाटील यांनी निवेदन देऊन मागे घेतले.