सातारा- न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना, हिसका देऊन पळणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. आरोपीचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. ही घटना गुरूवारी (ता. २७) घडली आहे. साहिल रुस्तूम शिकलगार ( रा. नागठाणे, ता. सातारा) असे पळून जाणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
हत्या व खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न
गुरूवारी पुन्हा त्या आरोपींना न्यायालयात घेऊन जात असताना, आरोपी साहिलने पोलिसांच्या ताब्यात पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चतुर पोलिसांनी त्याचा डाव हाणून पाडला. या प्रकरणी साहिलविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यातील नागठाणे (आष्टा) येथील तेजस विजय जाधव (वय १७) याची दोन महिन्यांपूर्वी २५ लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास करून तीन जणांना अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
गुरूवारी पुन्हा त्या आरोपींना न्यायालयात घेऊन जात असताना, आरोपी साहिलने पोलिसांच्या ताब्यात पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चतुर पोलिसांनी त्याचा डाव हाणून पाडला. या प्रकरणी साहिल विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.