सातारा :साताऱ्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नुकतीच मोठी कारवाई केली. ज्यात सातारा पोलीस अधीक्षकांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना पत्र पाठवले. ज्यात वाढत्या गुन्हागारीला आळा घालण्यासाठी कारवाई करणे गरजेचे असल्याचे नमूद करत या प्रस्तावाला मंजुरी मागितली होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना मंजूरी देताच त्यांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बोडरे टोळीवर 23 गुन्हे :सुरज बोडरे, ज्ञानेश्वर उर्फ नन्या बोडरे, रणजित भंडलकर, तानाजी लोखंडे, शरद उर्फ बाबू पवार, शंभू ननावरे, वैभव चक्हाण, सनी बोडरे, श्रीकांत बोडरे, गणेश मदने (सर्व रा. खामगाव, ता. फलटण), उमेश खोमणे (रा. खराडवाडी, ता. फलटण), सचिन मंडले (रा. साखरवाडी, ता. फलटण) आणि अमर बोडरे (रा. पिंपळवाडी, ता. फलटण), अशी मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. सुरज बोडरे हा टोळी प्रमुख असून इतर संशयित त्याचे साथीदार आहेत. या टोळीवर विविध कलमान्वये 23 गंभीर गुन्हे नोंद आहेत. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव फलटण ग्रामीण ठाण्याकडून पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आला होता.