सातारा Satara Murder : एका 13 वर्षांच्या मुलाचा गळा खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावात शनिवारी रात्री उशीरा उघडकीस आली आहे. मुलाचा मृतदेह उसाच्या फडात आढळून आला आहे. या घटनेमुळे हिवरे गावात तणावाचं वातावरण आहे. सध्या गावात पोलीस फौजफाटा दाखल झाला असून तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खूनसत्र सुरू आहे. सहा दिवसात खुनाच्या 5 घटना घडल्या आहेत.
एका 13 वर्षाच्या मुलाचा मृतदेह शनिवारी रात्री उशीरा उसाच्या फडात आढळून आला होता. त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. - शिवाजीराव भोसले, सहायक पोलीस निरीक्षक, वाठार स्टेशन सातारा
कोरेगावतील हिवरे गावात तणाव :अवघ्या 13 वर्षांच्या मुलाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावात रविवारी सकाळपासून तणावाचे वातावरण आहे. शनिवारी रात्री उशीरा उसाच्या फडात मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याचा धारदार शस्त्रानं खून करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले यांच्यासह पोलीस फौजफाटा हिवरे गावात दाखल झाला आहे. मुलाच्या खुनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेमुळं गावात तणावपूर्ण शांतता आहे.
सहा दिवसात खुनाच्या पाच घटना :गेल्या सहा दिवसापासून सातारा जिल्ह्यात खूनसत्र सुरू आहे. 18 डिसेंबर रोजी ढेबेवाडी (ता. पाटण) इथं बांधकाम साहित्य पुरवठादाराचा तीन जणांनी खून केला. त्यानंतर माण तालुक्यातील पर्यंती या गावात संपताबाई लक्ष्मण नरळे आणि नंदाबाई भिकू आटपाडकर या वयोवृद्ध मायलेकींचा राहत्या घरात गळा आवळून खून करण्यात आला. या दुहेरी हत्याकांडानं माणदेश हादरून गेला. मायलेकींची हत्येचा अद्याप छडा लागेला नाही. शेतातील बांधाच्या वादातून खंडाळा तालुक्यातील अहिरे इथं शनिवारी भर चौकात एकानं चुलत भावाचा डोक्यात दगड घालून खून केला तर कोरेगावातील हिवरे गावात आता खुनाची पाचवी घटना घडली आहे.
सातारा जिल्ह्यात क्राईम रेट वाढला :जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत खुनाच्या सात घटना घडल्या आहेत. महामार्गावर अपघातांची देखील मालिका सुरू आहे. चोरी, घरफोडीच्याही अनेक घटना नोंद झाल्या आहेत. बेकायदेशीर शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण चांगलं असलं तरी वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश राखण्यात पोलीस दल कमी पडत असल्याचं गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
हेही वाचा :
- Satara Murder News: लग्न करण्यासाठी प्रियकरानं मित्राच्या मदतीनं केलीय प्रेयसीच्या पतीची हत्या; दोघांना अटक, एक फरार
- अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने बालकाची हत्या, मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलाकडून कृत्य
- Satara Crime : साताऱ्यातील खुनाचे गूढ उकलले, बाहेरख्याली पतीचा पोलीस पत्नीनेच सुपारी देऊन काढला काटा, पाच संशयितांना अटक