सातारा - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दहावर पोहोचला आहे. तर, ग्रामीण भागातील कष्टकरी, रोजगार हातावरती पोट असणारी जनता उपाशी पोटी राहु नये, यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दोन हजार कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे किट तयार करून घरपोच देत आहेत.
दोन हजार कुटुंबांना सातारा मनसेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
दोन दिवसांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, कोणीही जिल्ह्यात संभ्रम निर्माण करू नये, राजकारण करण्याची ही वेळ नसून परिस्थिती सावरण्यासाठी सगळयांनी पुढे येणे गरजेचे आहे.
satara corona

येथून पुढे देखील परिस्थिती अशीच राहिली तर पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मदत करणार असून गरजू नागरिकांनी संपर्क करावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.