सातारा -कोरोनाची लक्षणे असूनही काही रुग्ण दुर्लक्ष करीत आहेत. दुर्लक्षामुळे संपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होत आहे. तसेच रुग्ण उशिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर उपचार करण्यास अडचणी येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
'बाधिताच्या कुटुंबीयांनी बाहेर फिरू नये'
पाटील म्हणाले, की शासनाने 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली असून काही घटकांना मुभा देण्यात आली आहे. संचारबंदी असूनही काही जण बाहेर फिरत आहेत. नागरिकांनी शासनाने घातलेल्या निर्बंधांचे कोटोकरपणे पालन करण्याबरोबरच मास्क, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे. तसेच ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित आहे. अशा कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर फिरू नये, असेही पाटील यांनी सांगितले आहे.