महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 1 कोटीची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत - satara district central bank

राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ही मदत देऊ केली.

cm relief fund  मुख्यमंत्री सहाय्यता निधी  satara district central bank  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 1 कोटीची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

By

Published : Apr 20, 2020, 7:58 PM IST

सातारा- कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 1 कोटीचा डी.डी. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी तो स्वीकारला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 1 कोटीची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ही मदत देऊ केली. 1 कोटीचा डी.डी. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. हा 1 कोटीचा डीडी आमदार मरकंद पाटील यांच्या हस्ते सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्विकारला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, बँकेचे संचालक माजी आमदार प्रभाकर घार्गे, सुनिल माने, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी पुढे येऊन जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावा, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details