महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्हा बँक निवडणूक : संचालकांमुळे सभासदांचे नुकसान, उदयनराजेंचा आरोप

सातारा जिल्हा बँकेच्या कपाळकरंट्या संचालकांनी सभासदांचा गटविम्याचा प्रीमियम भरलाच नाही. संचालकांच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.असा घणाघात बँकेचे संचालक व खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

Udayanraje
Udayanraje

By

Published : Oct 30, 2021, 4:01 AM IST

सातारा -सातारा जिल्हा बँकेच्या कपाळकरंट्या संचालकांनी सभासदांचा गटविम्याचा प्रीमियम भरलाच नाही. संचालकांच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुलतानी संकट बँकेच्या कोणा नाकर्त्यामुळे ओढावले आहे. त्यांना आता मताचा दणका द्या, असा घणाघात बँकेचे संचालक व खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदव‍ारीवरुन बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे यांच्यात वाक् युद्ध रंगले आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे बँक पदाधिकाऱ्यांवर आज शाब्दिक हल्ला चढवला.

गटविम्याचा प्रिमीयम भरलाच नाही -

उदयनराजे म्हणाले की, शेतकरी वैद्यकीय विमा योजना बँकेने जुलै 2021 पासून लागू करण्याचे जाहीर करताना सोसायटीची थकबाकी नसावी, ही अट घातली होती. शेतकरी सभासदांनी उधार- उसनवार, गहाणवट करून थकबाकी भरली. सोसायटी सचिवांनी परिश्रमपूर्वक शेतकरी सभासदांची माहिती कळवूनही कपाळकरंट्या संचालकांनी त्यांचा गटविम्याचा प्रिमियम भरलाच नाही. या संचालकांच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतक-यांचा प्रिमियम बँकेने स्वनिधीतून भरण्याचे जाहीर केले होते. 31 जुलै 2021 पर्यंत सोसायटीचे कोणतेही कर्ज नसावे या निकषात पात्र असणाऱ्या शेतकरी कुटुंबातील एका सदस्यांच्या वैद्यकीय खर्चाची हमी बँकेने घेतली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 लाख 53 हजार व त्यांच्यावर अवलंबून असणारी एक व्यक्ती अशा पाच लाख जणांची यादी बँकेला मुदतीत सादर करण्यात आली. मात्र, तरीही वैद्यकीय प्रीमियम बँकेने भरलाच नाही.

सभासदांचे नुकसान -

बँकेने असा धरसोडीचा कारभार करून यशवंत विचारांना तिलांजली दिली आहे. योजनेची घोषणा करून कार्यवाही शून्य करायची हे कसले आलेत यशवंत विचार. पाताळयंत्री व्यक्तीच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकरी सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सभासदाला नागवां करण्याचंच पाप संबंधितांनी केले आहे. तळतळाटाचा जाब संबंधितांना विचारायची वेळ आली आहे. जे काही आहे ते इथेच फेडायचे आहे, हे पाप कुठे फेडणार आहात असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details