सातारा - पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्यात सॅनिटायझर चेंबरची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
कोरोनापासून बचावासाठी कराडमध्ये पोलिसांसाठी सॅनिटायझर चेंबर
लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी दिवस-रात्र रस्त्यावर आहेत. त्यांचा कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्यात सॅनिटायझर चेंबर कार्यान्वित झाला आहे.
लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी दिवस-रात्र रस्त्यावर आहेत. त्यांचा कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्यात सॅनिटायझर चेंबर कार्यान्वित झाला आहे. अधिकारी, कर्मचारी जेव्हा त्यांच्या कर्तव्यावरून घरी जातात किंवा घरातून कामावर येतात. त्यावेळी त्यांना काही सेकंद सॅनिटायझर चेंबरमधून जावे लागते. या चेंबरमुळे निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया होऊन पोलीस सुरक्षित होत आहेत. सॅनिटायझर चेंबरमध्ये प्रेशर फाॉगिंग मशिनचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस निर्जंतुकीकरण होऊनच कामावर किंवा कामावरुन घरी जात आहेत.