महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाटण येथे रविवारी व सोमवारी ग्रंथ महोत्सव व साहित्यसंमेलन

स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त यावर्षीही रविवार दि. 2 व सोमवार दि. 3 फेब्रुवारीला पाटण येथे ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

By

Published : Jan 31, 2020, 12:23 AM IST

patan
पाटण येथे रविवारी व सोमवारी ग्रंथ महोत्सव व साहित्यसंमेलन


सातारा- स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त यावर्षीही रविवार दि. 2 व सोमवार दि. 3 फेब्रुवारीला पाटण येथे ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सांस्कृतिक, साहित्याचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक तथा स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी दिली.

रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजता नगरपंचायत कार्यालय ते संमेलनस्थळी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. या ग्रंथदिंडीचा शुभारंभ पाटणचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या ग्रंथदिंडीत शाळा, महाविद्यालये, बालवाड्यांचे चित्ररथ, विद्यार्थी, साहित्य प्रेमी सहभागी होणार आहेत. याप्रसंगी ग्रंथ महोत्सवाचा शुभारंभ कलाशिक्षक अरूण खांडके यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळी 11.15 वाजता ज्येष्ठ साहित्यिक व निवृत्त प्राचार्य महावीर कॉलेज कोल्हापूरचे डॉ. सुनिलकुमार लवटे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी खा. छ. उदयनराजे भोसले असणार आहेत. तर यावेळी केंद्रीय समाजकल्याण मंत्री ना. रामदास आठवले, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) ना. शंभूराज देसाई, माजी सभापती एल. एम. पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस रविंद्र सोनावले, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दुपारी 2.30 वाजता ग्रामीण कथाकार प्रा. रविंद्र कोकरे यांचा कथाकथन कार्यक्रम होणार असून अध्यक्षस्थानी शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. तळमावलेचे संस्थापक अधयक्ष ऍड. जनार्दन बोत्रे असणार आहेत. दुपारी 3.30 वाजता पाटण परिसर व जिल्ह्यातील मान्यवर कवी, कवयित्री यांचे कवी संमेलन असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा ग्रंथ महोत्सव समितीचे सदस्य कवी प्रदीप कांबळे हे उपस्थित रहाणार आहेत. याचे सूत्रसंचलन प्रा. सौ. विजयमाला म्हासुर्णेकर करतील.

सोमवार दि. 3 फेब्रुवारीला सकाळी 10.30 वाजता स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच शीतल साठे व सचिन माळी प्रस्तुत नवयान शाहिरी महाजलसा यांचा शाहिरी कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11.30 वाजता खास शेतकऱ्यांसाठी शेती व शेतीचे अर्थकारण या विषयावर आधारीत व्याख्यान ठेवण्यात आले असून यावेळी प्रमुख वक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व अध्यक्षस्थानी एबीपी माझा वाहिनीचे पत्रकार राहूल कुलकर्णी असणार आहेत. दुपारी 2.30 वाजता चित्रपट व दूरदर्शन कलावंत आपल्या भेटीला येणार आहेत. यावेळी मालिका कलावंत विशाल कोलते, अभिनेता व दिग्दर्शक अमोल देसाई, चला हवा येवू द्या फेम नितीन बोंडारे, सिने अभिनेत्री मोनालिसा बागल यांची उपस्थिती असणार आहे. दुपारी 3.30 वाजता समारोपाचा कार्यक्रम हेणार असून अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषद मुंबईचे विश्वस्त एस. एम. देशमुख असणार आहेत. तर यावेळी कोल्हापूरच्या ज्येष्ठ लेखिका जयश्री दानवे, नेते गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सदर साहित्य संमेलनास्थळी विविध पुस्तक, ग्रंथ प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहेत. तरी यावेळी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे अहवाहन विक्रमबाबा पाटणकर व संयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details