साताऱ्यात गारपीट; दुष्काळी परिसरात बरसला वादळी पाऊस - पाऊस
माण तालुक्यात गुरुवारी रात्री गारपीट झाली. दहिवडी, वावरहिरे, गोंदवले या परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी स्थितीत काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गारपीट
सातारा - गंभीर स्वरुपाचा दुष्काळी परिसर म्हणून जाहीर केलेल्या माण तालुक्यात गुरुवारी रात्री गारपीट झाली. दहिवडी, वावरहिरे, गोंदवले या परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी स्थितीत काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.