महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराडमध्ये संशयास्पद बॅगमुळे बॉम्बची अफवा; पण... - satara latest news

कराडच्या बसस्थानकासमोर शुक्रवारी दिवसभर एक बॅग बेवारस स्थितीत होती. बॅगबद्दल संशय आल्याने रात्री पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी सातारहून श्वान आणि बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले. दोन्ही पथके तात्काळ कराडमध्ये दाखल झाली. त्यांनी बॅगची तपासणी केली. मात्र, बॅगमध्ये फक्त कपडे आढळल्याने कराडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

संशयास्पद बॅगमुळे बाँबची अफवा
संशयास्पद बॅगमुळे बाँबची अफवा

By

Published : Dec 12, 2020, 12:46 AM IST

Updated : Dec 12, 2020, 6:14 AM IST

कराड (सातारा) - कराडच्या बसस्थानकासमोर शुक्रवारी दिवसभर एक बॅग बेवारस स्थितीत होती. बॅगबद्दल संशय आल्याने रात्री पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी सातारहून श्वान आणि बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले. दोन्ही पथके तात्काळ कराडमध्ये दाखल झाली. त्यांनी बॅगची तपासणी केली. मात्र, बॅगमध्ये फक्त कपडे आढळल्याने कराडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

संशयास्पद बॅगमुळे बॉम्बची अफवा

पथके कराडामध्ये रात्री साठे आठच्या सुमारास दाखल-

कराड बसस्थानकासमोरील वेलनेस फॉरेव्हर मेडिकल दिवस-रात्र सुरू असते. मेडिकलसमोर मोठे पार्किंग आहे. त्या ठिकाणी एक बॅग शुक्रवारी दिवसभर बेवारस स्थितीत होती. त्या बॅगबद्दल संशय आल्यामुळे कराड शहर पोलिसांना सायंकाळी कळविण्यात आले. पोलिसांनी सातार्‍यातील श्वान आणि बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले. त्यानुसार पथके कराडात रात्री साठे आठच्या सुमारास दाखल झाली.

कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही-

श्वान तसेच बॉम्ब शोधक पथकातील कर्मचार्‍यांनी सावधपणे संशयास्पद बॅग ताब्यात घेऊन पाहणी केली. मात्र, त्यामध्ये फक्त कपडे आढळून आले. कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले-

दरम्यान, वेलनेस फॉरेव्हर या मेडिकल दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता. एका दाम्पत्याचा आपसातील वाद समोर आला. त्यामुळे त्या दाम्पत्याच्या वादात त्यांची बॅग तिथेच राहिली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बॅगमध्ये ओळखपत्र नसल्याचे बॅग नेमकी कोणाची, हे रात्री उशीरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

हेही वाचा-जाणून घ्या देशभरातील कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी

हेही वाचा-शिवसेना खासदार राजेंद्र गावितांवर विनयभंगाचा गुन्हा; गावितांनी आरोप फेटाळले

Last Updated : Dec 12, 2020, 6:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details