महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रामराजे नाईक निंबाळकर जिल्ह्यातील राजकारणाच्या इतिहासातील बेईमान माणूस असेल - जयकुमार गोरे - जिल्ह्यातील राजकारणाच्या इतिहासात बेईमान माणूस रामराजे नाईक निंबाळकर असेल- जयकुमार गोरे

मतदारसंघातील जनतेचे दु:ख संपविण्यासाठी मी हा त्याग केला आहे. जनतेच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न महत्वाचा आहे. रामराजेंनी मला संपविण्याचा प्रयत्न केला, पण रावण सीतेपायी लंका जाळून बसला, तसे गोरेंच्या नादी लागून त्यांचेच अस्तित्व संपत चालले आहे, अशी प्रतिक्रिया गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जयकुमार गोरे

By

Published : Aug 31, 2019, 11:50 PM IST

सातारा- दुष्काळी जनतेच्या प्रश्‍नासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. उद्या सोलापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मी प्रवेश करणार आहे. काँग्रेसमधील काहींना माझी अडचण वाटत होती. ती मी दूर केली असून त्यांनी आता मोकळा श्‍वास घ्यावा. जिल्ह्यातील राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सर्वात बेईमान माणूस म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांचे नावे लिहिले जाईल, अशी टीका माजी आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

माहिती देताना माजी आमदार जयकुमार गोरे

यावेळी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील कदम, अरूण गोरे, भीमराव पाटील यांच्यासह कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. मतदारसंघातील जनतेचे दु:ख संपविण्यासाठी मी हा त्याग केला आहे. जनतेच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न महत्वाचा आहे. रामराजेंनी मला संपविण्याचा प्रयत्न केला, पण रावण सीतेपायी लंका जाळून बसला, तसे गोरेंच्या नादी लागून त्यांचेच अस्तित्व संपत चालले आहे. आता त्यांना कटोरा घेऊन पक्ष्यांच्या दारात फिरावे लागत आहे. आता नवीन शासन निर्णय आला आहे. इथे केले ते येथेच फेडायचे आहे, असे जयकुमार गोरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details