सातारा - कोयना धरणात रविवार अखेर 34.58 टीएमसी (34.54 टक्के) एवढा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात 45 मिली मीटर पाऊस झाला असून आतापर्यंत 773 मिली मीटर पाऊस झाला आहे.
पावसाचा जोर ओसरला..
जिल्ह्यात रविवारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. सायंकाळपर्यंत बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली. जिल्ह्यात दिवसभरापासून सरासरी एकूण 6 मिली मीटर पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 235.8 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिली मीटर मध्ये पुढीलप्रमाणे आहे.
- सातारा- 5.0 (252.1)
- जावळी- 21.6 (397.8)
- पाटण-7.6 (327.1)