सातारा- कराड रेल्वे स्थानकावर रेल्वे चालकाच्या अनावधानाने मालवाहतूक रेल्वे पटरी सोडून चुकीच्या पटरीवर गेल्याने भरकटल्याची घटना घडली. या झालेल्या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
अरे देवा.. कराड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रुळ सोडून गेली मातीच्या ढिगाऱ्यावर
मालवाहतूक रेल्वे पटरी सोडून चुकीच्या पटरीवर गेल्याने भरकटल्याची घटना कराड रेल्वे स्थानकावर घडली. या झालेल्या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रेल्वे अपघात
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, इंजिन चालकाच्या अनावधानाने रेल्वे पटरी सोडून चुकीच्या पटरीवरून धावू लागली. मात्र ही पटरी नादुरुस्त आहे. शिवाय त्या पटरीवर मातीचे ठीग टाकण्यात आले आहेत. या पटरीवर रेल्वे काही अंतरावर जाऊन मातीच्या ढिगार्यावर जाऊन थांबली. त्यामुळे या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या माल वाहतूक रेल्वे ला 41 डब्बे जोडले होते.