सातारा : शहरात पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका राहत्या घराच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये, सुरु असलेल्या जुगार अडड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आठजणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे.
साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा - satara news
सातारा शहरातील मल्हार पेठेतील एका घराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये, जुगारअड्डा सुरु असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला असता आठ जण खेळताना आढळले. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठजणांवर गुन्हा दाखल
सचिन वसंत खंदारे (वय ४०), अशोक शंकर कदम (वय ६८), सुरज चंद्रकांत शिंदे (वय ३८), सुरज अशोक वायदंडे (वय २७), महेश शिवकुमार दरवेशी (वय ३०, सर्व रा. मल्हार पेठ, सातारा), ज्ञानेश्वर बबन लांडगे (वय ४५, रा. कर्मवीर कॉलनी, सातारा), अमोल लक्ष्मण वायदंडे (वय ३५) व विलास त्रिंबक धर्माधिकारी (वय ५०, दोघेही रा. शनिवार पेठ, सातारा) अशी संशयिताची नवे आहेत. या कारवाईत पोलिसांनी २१ हजार ४६० रुपयांची रोकड आणि पत्त्याची पाने, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांचा छापा
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार सातारा शहरातील मल्हार पेठेतील एका घराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये, जुगारअड्डा सुरु असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला असता आठ जण खेळताना आढळले. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी सापडलेली रोकड, साहित्य जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा-गोवा : वन अधिकारी व स्थानिकांमध्ये झटापट; 54 जणांवर गुन्हे दाखल