महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Kesari : कोण होणार महाराष्ट्र केसरी; 'या' दोन दावेदारांवर नजर - Satara Maharashtra Kesari Wrestling Competition News

यंदा 64 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ( Maharashtra Kesari Wrestling Competition ) साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात पार पडत ( Chhatrapati Shahu Sports Complex Satara ) आहे.

महाराष्ट्र केसरी
महाराष्ट्र केसरी

By

Published : Apr 9, 2022, 3:33 PM IST

Updated : Apr 9, 2022, 7:59 PM IST

सातारा - यंदा 64 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ( Maharashtra Kesari Wrestling Competition ) साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात ( Satara Chhatrapti Shahu Krida Sankul ) पार पडत आहे. यावेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा प्रमुख दावेदार समजला जाणारा सिंकदर शेख याचा धक्कादायक पराभव झाला आहे. मुंबईच्या विशाल बनकरने ( vishal Bankar ) त्याचा पराभव केला आहे.

पावसाने फेरले पाणी - 5 एप्रिल पासून सुरु असलेल्या या स्पर्धेत काल ( शुक्रवारी ) दुपाराच्या सत्रातील सामने अवकाळी पावसामुळे रद्द करावे लागले. आज सकाळी या सामन्यांना पुन्हा सुरुवात झाली आहे. उपांत्य फेरीतील लढती सकाळच्या सत्रात झाल्या.

दोघेजण दावेदार - गादी विभागात पृथ्वीराज पाटील याने हर्षद कोकोटेचा 8-0 ने पराभव केला आहे. तर माती विभागात अंतिम फेरीमध्ये प्रकाश बनकरकडून सिंकदर शेखचा 13-10 असा पराभव झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी किताबासाठी पृथ्वीराज पाटील आणि विशाल बनकर हे प्रबळ दावेदार ठरले आहेत.

हेही वाचा -महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : जाणून घ्या अटकेपार कामगिरी करणाऱ्या कराडकर मल्लांबद्दल!

Last Updated : Apr 9, 2022, 7:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details