महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 7, 2021, 4:25 PM IST

ETV Bharat / state

सातारची शिखरकन्या प्रियांका मोहिते हिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

प्रियांका मोहिते अतिशय तरुण वयात एव्हरेस्ट सर करणारी तिसरी भारतीय व पहिली सातारकर आहेच. यासोबत माउंट लोत्से, माउंट मकालु, माउंट अन्नपूर्णा ही जगातील अतिशय उंच शिखरे सर करणारी ती पहिली महिला भारतीय आहे.

Priyanka mohite
Priyanka mohite

सातारा :जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली सातारकर शिखरकन्या प्रियांका मोहिते हिला केंद्र सरकारचा "तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार" जाहीर झाला आहे. १३ रोजी दिल्लीत राष्ट्रपती भवनात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात तिचा सन्मान करण्यात येणार आहे.

प्रियांका मोहिते हिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर


शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान
प्रियांका मोहिते अतिशय तरुण वयात एव्हरेस्ट सर करणारी तिसरी भारतीय व पहिली सातारकर आहेच. यासोबत माउंट लोत्से, माउंट मकालु, माउंट अन्नपूर्णा ही जगातील अतिशय उंच शिखरे सर करणारी ती पहिली महिला भारतीय आहे. काही वर्षांपूर्वी तिला महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेले आहे.

पहिली भारतीय महिला गिर्यारोहक
जगातील १४ अष्टहजारी हिमशिखरांपैकी ४ हिमशिखरांवर निर्विवाद आणि निर्भेळ यश मिळवणारी प्रियांका ही पहिली महाराष्ट्रीय महिला गिर्यारोहक म्हणून परिचित आहे. २०१३ मध्ये जगातील सर्वोच्च अशा माऊंट एव्हरेस्टवर वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी मिळवलेल्या यशानंतर, जगातील ४थे अत्त्युच्च ल्होत्से (८,५१६ मीटर), २०१९ मध्ये ५वे अत्त्युच्च मकालू (८,४६३ मीटर) आणि २०२१ मध्ये तर अत्यंत भयावह असे अन्नपुर्णा (८,०९१ मीटर) या हिमशिखरांवर यशस्वीरीत्या चढाई करणारी ती पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे.

युथ आयकाॅन
अगदी शालेय जीवनापासूनच प्रियांकाने गिर्यारोहणाच्या अनगड, अवघड साहसवाटांवर केलेली वाटचाल इतकी शास्त्रशुद्ध आणि शिस्तबद्ध आहे की या क्षेत्रातील परिश्रम आणि सातत्यपूर्ण यशाचे ती मुर्तीमंत उदाहरण होऊन बसली. गिर्यारोहणातील एक कणखर युथ आयकाॅन म्हणून तिने ओळख निर्माण केली.
हेही वाचा -बुलडाणा पतसंस्थेतील त्या पैशांशी अशोक चव्हाणांचा संबंध आहे का? किरीट सोमैयांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details