महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीवर 'पृथ्वी'राज; 22 वर्षांनंतर कोल्हापूरला मान

By

Published : Apr 10, 2022, 5:04 PM IST

महाराष्ट्र केसरीच्या ( Maharashtra Kesari ) गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील (वय-२०) विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये गुणाधिक्क्याने पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा ( Prithviraj Patil Win Maharashtra Kesari ) पटकावली.

Prithviraj Patil
Prithviraj Patil

सातारा -महाराष्ट्र केसरीच्या ( Maharashtra Kesari ) गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील (वय-२०) विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये गुणाधिक्क्याने पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा ( Prithviraj Patil Win Maharashtra Kesari ) पटकावली. कुस्तीची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला तब्बल २२ वर्षांनंतर चांदीची गदा मिरवण्याचा बहुमान मिळाला आहे.

अखेरच्या दीड मिनिटांत कलाटणी -सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या पृथ्वीराज पाटील याने चार गुणांची दरी भरुन काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला. ६४ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. कुस्ती क्रीडा प्रकारातील मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या मल्लाने बाजी मारली. अटीतटीच्या लढतीत पिछाडीवर असताना पृथ्वीराजने अखेरच्या ४५ सेकंदात सामन्याला कलाटणी दिली. त्याने ५-४ अशा फरकाने सामना जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला.

विशाल बनकरची दमदार सुरुवात -विशाल बनकरने आपल्या नैसर्गिक उंचीचा फायदा उठवत पृथ्वीराजला बरोबर आक्रमक खेळी करून पहिल्या फेरीत ४-० अशी आघाडी घेतली होती. दोघांनीही एकमेकांची मनगटे धरल्याने पंचांनी त्यांना ही कुस्तीतील निष्क्रियता आहे, असे सांगून रोखले. मनगटे सोडून कुस्ती करण्याची सूचना केली. दोन वेळा पैलवान कुस्ती करताना आखाडा सोडून बाहेर गेले.

पृथ्वाराज पाटीलने विशाल बनकरला चितपट केले

अखेरची खेळी ठरली यशस्वी -पहिल्या फेरीअखेर आक्रमक खेळ करत पृथ्वीराजने एक गुण वसूल केला. दोघांच्याही आक्रमक खेळाने दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. अखेरचा दीड मिनिट शिल्लक असताना पृथ्वीराजने दोन गुण वसूल केले. त्यावेळी गुणफलक बनकर ४ तर पृथ्वीराज ३ असा होता. हा सामना बनकरच्या पारड्यात झुजतोय की काय असे वाटत असतानाच पृथ्वीराजने आणखी २ गुण वसूल केले. त्यामुळे बनकरपेक्षा पृथ्वीराजकडे १ गुणाची आघाडी होती. उत्कंठा वाढवणा-या अत्यंत चुरशीच्या या सामन्यात अखेर एका गुणाने पृथ्वीराज पाटीलने चांदीच्या गदेवर नाव कोरले.

हेही वाचा -महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : जाणून घ्या अटकेपार कामगिरी करणाऱ्या कराडकर मल्लांबद्दल

ABOUT THE AUTHOR

...view details