महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gujarat Elections : गुजरात निवडणुकीत चव्हाणांवर बडोदा,अहमदाबादच्या निरीक्षकपदाची जबाबदारी - Prithviraj Chavan on Ahmedabad tour

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Former Chief Minister Prithviraj Chavan ) यांच्यावर गुजरात निवडणुकीत ( Gujarat Elections ) मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेसकडून त्यांच्यावर प्रचारासह बडोदा आणि अहमदाबाद विभागाचे निरीक्षक म्हणून पक्ष नेतृत्वाने जबाबदारी दिली आहे.

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

By

Published : Nov 14, 2022, 10:21 PM IST

सातारा -कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Former Chief Minister Prithviraj Chavan ) यांच्यावर गुजरात निवडणुकीत ( Gujarat Elections ) मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेसकडून त्यांच्यावर प्रचारासह बडोदा आणि अहमदाबाद विभागाचे निरीक्षक म्हणून पक्ष नेतृत्वाने जबाबदारी दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण तेथे राज्य, जिल्हानिहाय कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन संवाद साधणार आहेत. तसेच त्यांच्या पत्रकार परिषदा सुद्धा होणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे पुढील चार दिवस गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर ( Prithviraj Chavan on Ahmedabad tour ) आहेत. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून बडोदा व अहमदाबादचे निरीक्षक म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्ष नेतृत्वाने जबाबदारी सोपवल्याची माहिती चव्हाण यांच्या कराडमधील कार्यालयातून देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details