सातारा - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान झाले. मतांचा टक्का वाढविण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे काही प्रमाणात मतांचा टक्का देखील वाढला गेला आहे. तर सातारा येथील प्राची घाडगे यांनी प्रेग्नेंट असताना सुद्धा मतदान केले. प्रसव वेदनांची घटिका जवळ येऊन पोहोचली होती, तशाही अवस्थेत प्राचीने मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर काही तासाभरातच त्यांनी एका कन्येला जन्म दिला.
गर्भवती महिलेने रांगेत उभे राहून केले मतदान.. एका तासानंतर दिला कन्यारत्नाला जन्म
र्तव्यपूर्तीचे समाधान व मात्र सुखाचा आनंद असा दुहेरी योग प्राची घाडगे यांनी साधला. प्राची घाडगे यांच्या पतीचे दोन महिन्यापूर्वी आकस्मिक निधन झाले.
या महिलेने सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी एका कन्येला जन्म दिला आहे. कर्तव्यपूर्तीचे समाधान व मात्र सुखाचा आनंद असा दुहेरी योग प्राची घाडगे यांनी साधला. प्राची घाडगे यांच्या पतीचे दोन महिन्यापूर्वी आकस्मिक निधन झाले. तेव्हा त्या सात महिन्याच्या गर्भवती होत्या दुःखाचा डोंगर पचवून त्या प्रसव कालावधीसाठी तयार झाल्या.
मंगळवारी मतदानाच्या दिवशी प्रसूती केव्हाही होण्याची शक्यता होती. असे असतानाही प्राची आणि डॉक्टरांची परवानगी घेऊन आपल्या नातेवाईकांच्या मदतीने बोरिवलीतील २३ नंबर शाळेत येऊन मतदानाचा हक्क बजावला. पुन्हा माघारी गेल्यावर सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी त्यांनी मुलीला जन्म दिला बाळ व आई दोन्ही सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अवघडलेल्या अवस्थेत ही आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या मातेचे पूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.