महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळामुळे शेतकरी हैराण; डाळिंबाच्या बागा केल्या नष्ट

सातारा जिल्ह्यातील दुष्काळामुळे माण, फलटण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील डाळिंबाच्या बागा पूर्णपणे जळून गेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या आहेत.

डाळिंबाच्या बागा

By

Published : Feb 23, 2019, 1:40 PM IST

सातारा - दुष्काळामुळे जिल्ह्यातील माण, फलटण, खटाव कोरेगाव परिसरातील डाळिंबाच्या बागा पूर्णपणे जळून गेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी त्यांच्या बागा देव भरवशावर सोडून दिल्या आहेत. मात्र, तरीही शासन याकडे ढुंकूनही बघण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

डाळिंबाच्या बागा

या भागात १९९५ पासून डाळिंबाची लागवड शेतकरी करू लागले होते. पावसाचे अत्यल्प प्रमाण बघता शेतकऱ्यांनी अनेक वेळा बागा जगवण्यासाठी टँकरने पाणी दिले. या भागात गणेश, भगवा डाळिंब तसेच वेगवेगळ्या जातीचे उत्पादन घेतले जाते. या तालुक्यातून परदेशी बाजारपेठांना डाळिंबाची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जात होती. गेल्या २ ते ३ वर्षाच्या पावसाच्या अनियमितपणामुळे येथील शेतकऱ्यांनावर मोठे संकट कोसळले आहे.

जिल्ह्यात पाण्याचा आणि चाऱ्याचा वनवा असल्याने जनावरांचीदेखील परवड होत आहे. येथील शेतकरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहे. या प्रतिकूल परिस्थितीमुळे जिल्ह्यातील ३६९ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी भागात होणारी शासनाची मदत कायमच चिंतेची बाब ठरली आहे. शासनाने यावरती कोणती तरी ठाम भूमिका घेऊन, या भागात चारा छावण्या तसेच डाळिंब बागांना हेक्टरी अनुदान देणे गरजेचे आहे, असे मत पीडित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details