सातारा - बॉम्बे रेस्टॉरंट, देगाव फाटा, अजंठा चौक येथे बेकायदा दारू विक्री व जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यात तब्बल अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यात अवैध धंद्यावर छापे, अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - police
देगाव फाटा येथे जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी व रोख रक्कम असा एकूण ८७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईमध्ये सुरेश भीमा पवार (वय ५१ रा. कारंदवाडी याच्यावर बेकायदा विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच देगाव फाटा येथे जुगार प्रकरणी मिसू भाऊ कांबळे (रा. प्रतापसिंहनगर), गोरख बाबा बनसोडे (रा. कोडोली), निलेश लक्ष्मण जगताप (रा. शनिवार पेठ), धनाजी दत्तात्रय खेरडे (रा.देगाव फाटा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
देगाव फाटा येथे जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी व रोख रक्कम असा एकूण ८७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बॉम्बे रेस्टॉरंट जवळ अमोल प्रकाश चव्हाण (वय २२), ऋषिकेश संतोष मोरे (वय २८), राजूभाई दाशिर (वय ३८), रियाज समसुद्दिन मुजावर (वय २६) (सर्व रा.सातारा शहर) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी, रोख रक्कम असा एकूण ५५ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तीनही करावया सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत.