महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara Crime : महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला २१ वर्षांनी अटक - Satara Crime

महिलेची हत्या करून फरार झालेल्या संशयिताला २१ वर्षांनी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. किसन नामदेव जाधव (रा. भुषणगड, ता. खटाव) असे आरोपीचे नाव आहे. मेंढपाळ बनून तो वाड्यावस्त्यांवर वावरत होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. कोरेगाव तालुक्यातील एकसळ गावात २१ वर्षांपूर्वी महिलेचा खून झाला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीचा शोध पोलीस घेत होते.

Kisan Namdev Jadhav
किसन नामदेव जाधव

By

Published : Jul 27, 2023, 11:00 PM IST

सातारा : कोरेगाव तालुक्यातील महिलेची हत्या करून फरार झालेल्या संशयिताला २१ वर्षांनी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. किसन नामदेव जाधव (रा. भुषणगड, ता. खटाव) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने २१ पूर्वी एका महिलेचा खुनाचा जाधववर आरोप आहे. आरोपी किसन नामदेव जाधव मेंढपाळ बनून गेल्या २१ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, पोलिसाना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी किसन नामदेव जाधवच्या भूषणगडात मुसक्या आवळ्या आहेत.

हत्या करून आरोपी फरार :कोरेगाव तालुक्यातील एकसळ गावात २१ वर्षांपूर्वी महिलेचा खून झाला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीचा शोध पोलीस घेत होते. संबंधित महिलेचा खून हा खटाव तालुक्यातील भूषणगड येथील एक युवकाने केला असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, घटनेपासून संशयित आरोपी फरार होता. त्याला तब्बल २१ वर्षानंतर अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले.

एलसीबीच्या कारवाईचे कौतुक :खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी गुंगारा देत असल्याने त्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी एक पथक तयार केले. फरार आरोपी किसन नामदेव जाधव भूषणगड (ता. खटाव) येथे मेंढपाळ म्हणून वावरत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भूषणगड येथे जाऊन संशयिताच्या नांग्या ठेचत त्याला ताब्यात घेतले आहे.

२००२ साली झाली होती महिलेची हत्या :कोरेगावातील लक्ष्मीनगर येथे दि. २२ फेब्रुवारी २००२ रोजी मालन बचन बुधावले (वय ३५, रा. एकसळ ता. कोरेगाव) ही महिला मृतावस्थेत आढळली होती. पोलीस तपासात किसन नामदेव जाधव (रा. भूषणगड, ता. खटाव) या आरोपीने खून केल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. गुन्हा घडल्यापासून संशयित आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपी ओळख लपवून वाड्यावस्त्यांवर मेंढपाळ बनून वावरत होता. अखेर पोलिसांना महिती मिळताच २१ वर्षांनी आरोपी किसन नामदेव जाधवला भूषणगडातून बेड्या ठोकल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details