महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाईत कुटुंबाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूला बेड्या

वाई तालुक्यातील पीडित कुटुंब मानसिक आणि शारीरिक त्रासाने ग्रस्त होते. त्यामुळे हे कुटुंब एका व्यक्तीच्या सांगण्यावरून गणेश शिंदे या भोंदूबाबाकडे गेले. त्याने पीडिताला अघोरी विधी करण्यास सांगितले. तसेच हा विधी न केल्यास त्याच्या पत्नीला मृत्यू येईल, अशी बतावणी केली.

satara
वाईत कुटूंबाची लाखो रुपयांची फसवणुक करणाऱ्या भोंदूला बेड्या

By

Published : Mar 15, 2020, 2:19 PM IST

सातारा - करणी काढण्याच्या आणि सोन्यात गुंतवलेले पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने वाई तालुक्यातील कुटुंबाला 21 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. वाई पोलिसांत या भोंदूबाबावर फसवणूक आणि जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. गणेश विठोबा शिंदे (वय 45 रा. चांदवडी ता. वाई) असे या भोंदू बाबाचे नाव आहे.

वाईत कुटूंबाची लाखो रुपयांची फसवणुक करणाऱ्या भोंदूला बेड्या

हेही वाचा -रंगाचा बेरंग ! रंगपंचमीच्या इव्हेंटवर सातारा पोलिसांची 'धुवून टाक' कारवाई

वाई तालुक्यातील पीडित कुटुंब मानसिक आणि शारीरिक त्रासाने ग्रस्त होते. त्यामुळे हे कुटुंब एका व्यक्तीच्या सांगण्यावरून गणेश शिंदे या भोंदूबाबाकडे गेले. त्याने पीडिताला अघोरी विधी करण्यास सांगितले. तसेच हा विधी न केल्यास त्याच्या पत्नीला मृत्यू येईल, अशी बतावणी केली. विधीच्या बहाण्याने भोंदूबाबा पीडित कुटुंबियांच्या घरी गेला. त्यातील प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र भेटून त्याने सर्व घराची माहिती गोळा केली. या माहितीचा आधार घेत गणेशने घरातील प्रत्येकाला दुसऱ्या सदस्याचा मृत्यू होईल, असे सांगितले. त्यामुळे विधी करणे आवश्यक आहे असे सांगण्यास त्याने सुरवात केली.

हेही वाचा -राज्यात 'या'ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिला गुन्हा दाखल

या कुटुंबातील दुसऱ्या नवविवाहित जोडप्यातील पतीलाही तुझ्या पत्नीचा मृत्यू होईल. तुझ्या होणाऱ्या अपत्याचा जन्माआधी मृत्यू होईल, अशी भीती दाखवली. घाबरलेल्या पीडित कुटूंबाच्या आगतिकतेचा गैरफायदा या भोंदूने उचलला. नवविवाहित जोडप्यातील पत्नीला तुमचा पती सहा महिन्यांमध्ये जोगत्या होईल. तुमच्या पुढील सात पिढ्या तृतीयपंथीय म्हणून जन्माला येतील, अशी भीती दाखवली. त्यामुळे हे कुटुंबीय चांगलेच घाबरले. याचा फायदा घेत गणेशने अघोरी विधीसाठी 8 लाख रुपयांची मागणी केली. तसेच हा विधी केला नाही तर आठ दिवसात पतीचा मृत्यू होईल, असेही सांगितले.

हेही वाचा -पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने 21 लाखांची फसवणूक; पाच जणांवर गुन्हा दाखल

त्यामुळे या कुटुंबाने कर्ज काढून आणि व्याजाने पैसे घेऊन ते गणेशला दिले. त्याने 5 लाख रुपयांचा दैवी ताईत दिल्याची बतावणी केली. करणी काढण्यासाठी विविध अघोरी विधींसाठी त्याने या कुटुंबाकडून सुमारे 12 लाख रुपये उकळले. भोंदू गणेश शिंदे याला पीडित कुटुंबाने मोठी रक्कम दिल्याने या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी सोन्यात गुंतवणूक त्याने या कुंटूंबाला सांगितले. त्यासाठी मुंबईतील फ्लॅट आणि गावाकडील घर गहाण ठेवून पैसे गोळा करा. एका महिन्यात पैसे परत देऊन घर सोडवा. एका महिन्यात तुम्हाला पैसे दुप्पट करून देतो, असे त्याने सांगितले.

हेही वाचा -एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून 24 लाखांवर डल्ला, साताऱ्यातील प्रकार

याला भुलून पीडित कुटुंबाने त्याला 9 लाख 50 हजार रुपये दिले. मात्र, एका महिन्याने पैशांची मागणी करताच त्याने बहाणा सुरू केला. पैसे परत देतो असे सांगून 14 लाख 65 हजार रुपयांचा धनादेश या कुटुंबाला दिला. मात्र, तो खोटा असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिडीत कुटुंबाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली. अंनिसने कुटुंबीयांना घेऊन वाई पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी एकूण 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details