महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 10, 2020, 3:23 AM IST

ETV Bharat / state

कराडमधील पोलीस आणि पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना कोरोनाची लागण

कराड पोलीस उपविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कराड पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख अधिकार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. उपविभागाच्या पोलीस अधिकार्‍यांसह त्यांच्या कुटुंबातील अन्य एक आणि कार्यालयातील दोन कर्मचारीही बाधित आढळले आहेत.

कराड
कराड

कराड (सातारा) - कराडमधील पोलीस आणि कराड पंचायत समितीच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस खाते, गृहरक्षक दलातील कोरोनाची लागण झालेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांची संख्या पन्नासच्या वर गेली आहे. पंचायत समितीच्या मुख्य प्रशासकीय अधिकार्‍यासह त्यांच्या शासकीय गाडीचा चालकही कोरोनाबाधित आढळला आहे.

सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परंतु, प्रशासकीय अधिकार्‍यांना कोविड योध्दे म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी लागत आहे. यामुळे नकळतपणे ते सुध्दा कोरोनाबाधितांच्या संपर्कात येत आहेत. अशामुळे कराड पोलीस उपविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कराड पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख अधिकार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. उपविभागाच्या पोलीस अधिकार्‍यांसह त्यांच्या कुटुंबातील अन्य एक आणि कार्यालयातील दोन कर्मचारीही बाधित आढळले आहेत. आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांतील चार पोलिस अधिकारी, 41 पोलीस आणि गृहरक्षक दलाचे 10 जवानही कोरोनाबाधित आढळले आहेत.

कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचार्‍यांसह पोलीस कर्मचार्‍यांना देखील फिल्डवर रहावे लागत आहे. त्यातून कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे ते सुध्दा कोरोनाबाधित होऊ लागले आहेत. कोरोनाचे संक्रमण वाढत असले तरी सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी जरा सुध्दा मागे हटलेले नाहीत. प्रत्येक कर्तव्य ते जबाबदारीने पार पाडत आहेत.

हेही वाचा -मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत राजकीय खलबते; कंगना संदर्भात सावध भूमिका घेण्याची पवारांची सूचना

ABOUT THE AUTHOR

...view details