सातारा - काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४५ जवान हुतात्मा झाले होते. त्याचा निषेध करण्यासाठी आज साताऱ्यात मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच, दहशतवाद्यांची तिरडी उचलण्यात आली
साताऱ्यात दहशतवाद्यांची प्रतिकात्मक तिरडी; पुलवामा हल्ल्याचा केला निषेध - terrorist
नागरिकांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण खटाव, माण, फलटण, कोरेगाव, वाई याठिकाणी विविध संघटना संस्था तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, म्हसवड येथे जनावरांच्या चारा छावणीत ७४ गावातील ३ हजार शेतकरी कुटुंबांनी एकत्रपणे श्रद्धांजली वाहिली. कराडमध्ये मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
फलटणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी नागरिकांनी मेणबत्त्या लावून व दोन मिनिटे स्तब्ध होऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. खटाव येथे बॉक्सर ग्रुपतर्फे पाकिस्तानच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच, गोंदवले येथे मोर्चा काढून दहशतवाद्यांची तिरडी यात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा निषेध केला.