महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये साताऱ्याचा डंका.. पाचगणी ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर.. तर कराडला तृतीय क्रमांक - पाचगणी ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर

‘स्वच्छ सर्वेक्षण' स्पर्धेत सातारा जिल्ह्याने आपली घोडदौड कायम राखली आहे. हिल स्टेशन असलेले पाचगणी देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले असून Panchgani city declared the cleanest city in india याच श्रेणीत कराड शहराला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीतील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

Panchgani city declared the cleanest city in India in clean survey competition Karad was ranked third
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये साताऱ्याचा डंका.. पाचगणी ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर.. तर कराडला तृतीय क्रमांक

By

Published : Oct 1, 2022, 11:07 PM IST

सातारा - ‘स्वच्छ सर्वेक्षण' स्पर्धेत सातारा जिल्ह्याने आपली घोडदौड कायम राखली आहे. हिल स्टेशन असलेले पाचगणी देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले Panchgani city declared the cleanest city in india असून याच श्रेणीत कराड शहराला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


पाचगणी ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर :देशातील १ लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांच्या श्रेणीत सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराने पहिल्या क्रमांकाचा तर याच श्रेणीत कराड नगरपरिषदेला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर, कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या उभय शहरांनी शहर स्वच्छता आणि सुशोभीकरणात उत्तम कामगिरी केली असून स्थानिकांचाही त्यास उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पाचगणी, कराड आणि रहिमतपूर या नगरपालिकांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्राचा देशभर डंका वाजवला आहे.


‘बेस्ट परफॉर्मिंग’मध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर :विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राला आज एकूण २३ पुरस्कार प्रदान करण्यात आले असून स्वच्छ सर्वेक्षणच्या 'बेस्ट परफॉर्मिंग’मध्ये महाराष्ट्राला तृतीय क्रमांक मिळाला आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमध्ये ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-२०२२’ अंतर्गत विविध श्रेणीतील सर्वोत्तम १२ पुरस्कारांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यावेळी वितरण करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी, राज्यमंत्री कौशल किशोर आणि सचिव मनोज जोशी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details