सातारा -अॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडीट कार्डचे लिमीट वाढवण्याच्या बहाण्याने साताऱ्यातील एका महिलेची एक लाख 7 हजार 353 रूपयांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तृप्ती प्रसन्न साळुंखे (रा. करंजे, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार साळुंखे यांच्या मोबाइलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने अॅक्सिस बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून साळुंखे यांना त्यांच्या क्रेडीट कार्डचे लिमीट वाढवण्याच्यासाठी तसेच साडे नऊ हजार रूपयांचे गिफ्ट देण्यासाठी फोन केल्याचे सांगितले. त्यावर साळुंखे यांनी विश्वास ठेवत त्याच्यासोबत संभाषण सुरू ठेवले. त्याने त्यांच्या क्रेडीट कार्डच्या नंबरचे शेवटचे चार अंक विचारून घेतले. त्यानंतर तक्रारदार यांच्या मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर विचारून घेतला.