महाराष्ट्र

maharashtra

पाटण तालुक्यात 'एक गाव एक गणपती'; गृहराज्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

By

Published : Jul 26, 2020, 4:08 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यामध्ये 'एक गाव एक गणपती' उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सवातील खर्चाला फाटा देत तो पैसा कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी खर्च करण्याचा निर्णयही या सर्वपक्षीय बैठकीत झाला.

One village, one Ganpati in Patan taluka  due to corona crisis
पाटण तालुक्यात 'एक गाव एक गणपती'

कराड (सातारा) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यामध्ये 'एक गाव एक गणपती' उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सवातील खर्चाला फाटा देत तो पैसा कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी खर्च करण्याचा निर्णयही या सर्वपक्षीय बैठकीत झाला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आज (रविवार) ही बैठक झाली.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेनुसार करावा, असे आवाहन गृहराज्यमंत्री देसाईंनी जनतेला केले. तसेच त्याची सुरूवात त्यांनी स्वत:च्या पाटण मतदारसंघातून केली आहे.
पाटण तहसील कार्यालयातील लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी देसाई यांच्या संकल्पनेला एकमुखी पाठिंबा दिला.


गर्दी टाळणे, हा कोरोना रोखण्याचा उपाय आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा विना गर्दीचा होण्यासाठी गृहराज्यमंत्री या नात्याने मी 'एक गाव एक गणपती' संकल्पना राबवावी, असे राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला आवाहन करत असल्याचे देसाई म्हणाले. यावेळी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, डीवायएसपी अशोक थोरात, तहसिलदार समीर यादव, पाटणचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, ढेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी हिंदुराव पाटील, भाजपचे फत्तेसिंह पाटणकर, शिवसेना तालुकाप्रमुख जयवंतराव शेलार, मनसेचे गोरख नारकर, आरपीआयचे प्राणलाल माने, बहुजन समाजवादी पक्षाचे शिवाजी कांबळे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details