सातारा -येथील क्रांतीसिंह नाना पाटील रूग्णालयातून कोरोना बाधिताचा सहवासित कोरोना मुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. त्याचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला रूग्णालयातून घरी पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तर आतापर्यंत सर्वसाधारण रूग्णालयातून जिल्ह्यातील पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
बाधिताचा निकट सहवासित झाला कोरोना मुक्त; जिल्ह्यातील पाचवा रुग्ण घरी - satara corona news
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील रूग्णालयातून कोरोना बाधिताचा सहवासित कोरोना मुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. त्याचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला रूग्णालयातून घरी पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
बाधिताचा निकट सहवासित झाला कोरोना मुक्त
यावेळी त्याला उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात शुभेच्छा दिल्या. तर पुढचे १४ दिवस घरीच इतरांपासून अलिप्त (होम क्वारंटाईन) रहावे लागेल, अशी सुचना त्याला आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा -कोरोना वॉरियर्स ; संचारबंदीत कोरोनाशी लढणाऱ्या पोलिसांसह कुटुंबियांना धोका, सुरू झाली तपासणी . . .