सातारा- एका सात वर्षीय चिमुकली अत्याचार झाल्याची घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी संशयित आरोपी तानाजी दौलत भगत (वय 58 वर्षे, रा. पिंपरद, ता. फलटण) याला फलटण पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - सीसीए आणि एनआरसी विरोधात जामनेर बंद; भारत मुक्ती मोर्चाने दिली बंदची हाक
याबाबत सविस्तर वृत्त असे, तानाजी भगत याने 26 जानेवारीला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका 7 वर्षाच्या चिमुरडीला गोड बोलून घरात नेले. त्या ठिकाणी त्याने चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना तिच्या आईला समजल्यानंतर तिने याबाबात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कलमान्वये तानाजी भगत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.