सातारा - सहकारी बँका तसेच पतसंस्थानी, विविध सहकारी संस्थांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करू नये, त्यांना किमान वेतन द्यावे, असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
सहकारी नोकरांची वेतन कपात नको - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील - corona update
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे, तर राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे उद्योगधंदे, खासगी पंतसंस्थांवर परिणाम झाला आहे.
कोरोनाच्या महामारीचा परिणाम राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. यावर औषधांपेक्षा लोकांनी सुरक्षित अंतर ठेवणे आणि कारणाशिवाय गर्दी न ठेवणे हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसायांबरोबर बँकेच्या तसेच पतसंस्थांच्या व्यवहारावरही परिणाम झाला आहे. तरी राज्यातील सहकारी बँका पतसंस्था यांनी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करू नये. त्यांना किमान वेतन द्यावे. तसेच राज्यातील विवि बाजार समित्या सुरू आहे. त्यामधील अधिकारी आणि कामगारांच्या वेतनामध्येदेखील कपात करू नये, असे आवाहन त्यांनी केले.