सातारा - निजामुद्दीन येथील "मरकज" या धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या देशातील विविध ठिकाणच्या काही नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सातारा जिल्ह्यातील जे 7 नागरिक मरकज साठी गेले होते, तसेच शासनाकडून मरकजशी निगडीत असलेल्या 5 नागरिकांची नावे आली होती. त्या १२ जणांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तथापि आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन सुचना नुसार त्यांना संस्थात्मक अलगीकरण (क्वॉरंटाईन) मध्ये ठेवण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
निजामुद्दीन येथे मरकजसाठी गेलेल्या साताऱ्यातील सातही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह - कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये
निजामुद्दीन येथील मरकजसाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. भिती न बाळगता दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
साताऱ्यातील सातही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
जिल्ह्यात नवे ४ अनुमानीत दाखल
सातारा जिल्ह्यातील आज 12 ते 68 वयोगटातील 3 पुरुषांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे येथील जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. तसेच काल जिल्हयातीलच 55 वर्षांच्या पुरुषाला श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे सातारा हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर येथे विलगीकरण कक्षात ठेवले असल्याचे शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले.